छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो): जिल्हा परिषदचे ६३ गट आणि पंचायत समिती १२६ गणयासाठी आज सकाळपासून ग्रामीण भागात २२८२ मतदान केंद्रामध्ये संथ गतीने मतदान सुरू झाले. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्र आणि परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन आणि सिलोड तालुक्यातील अंभई येथे किरकोळ वाद झाले. तर पैठणचे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी आपले मतदान करताना त्यांच्या लहान मुलाला सोबत नेत मतदान केले..
जिल्ह्यातील तालुकानिहाय गट गण पुढील प्रमाणे- आहेत. सोयगाव-३ गट, ६ गण, सिल्लोड-९ गट, १८ गण, कन्नड-८ गट, १६ गण, फुलंब्री ४ गट, ८ गण, खुलताबाद-३ गट, ६ गण, वैजापूर-८ गट, १६ गण, गंगापुर-९ गट, १८ गण, छत्रपती संभाजीनगर १० गट, २० गण, पैठण ९ गट, १८ गण असे एकूण ६३ गट व १२६ गण आहेत . तर तालुकानिहाय मतदान केंद्र संख्या याप्रमाणे- सोयगाव-११३, सिल्लोड-३०५, कन्नड-३१७, फुलंब्री-१५५, खुलताबाद-१०४, वैजापूर-२८१, गंगापूर-३४७, छत्रपती संभाजीनगर-३५४, पैठण-३०६. या सर्व मतदान केंद्रावर मतदार सकाळपासून रांगेत उभे राहिले होते. विशेषतः महिलांची गर्दी मोठ्याप्रमाणाआहे. महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हापासून महिलांच्या मतदारांची संख्या वाढली आहे.
नवरदेवाने लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क
छत्रपती संभाजी नगर शहरालगत असलेल्या पिसादेवी येथील मतदान केंद्रावर लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. कृष्णा तायडे असे या नवरदेवाच नाव आहे. माझे लग्न असताना देखील मी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो आहे लोकशाहीने आपल्याला दिलेला हा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावाला हवा माझे लग्न असून मी आलो तसंच प्रत्येकाने बाहेर पडून मतदान करायला पाहिजे असे आवाहन हळदीने माखलेल्या नवरदेवाने केले केले.
खासदार कल्याण काळे यांनी बजावला मतदानाचा हक्क
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रिया आज राज्यभरात पार पडत आहे. या छत्रपती संभाजी नगरातील ६३ जिल्हा परिषद आणि १२६ पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रिया होत आहे. यावेळी जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी मला मतदानाचा हक्क बजावला आहे. छत्रपती संभाजीनगर लगत असलेल्या पिसादेवी येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान करून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांनी कॉरिडोर या शब्दाचा अर्थ कल्याण व काळे यांना माहीत नसल्याची टीका केली होती यावर प्रत्युत्तर देत कल्याण काळे यांनी ड्रायफ्रूट आणि ड्रायपोर्ट यांच्यातील अर्थ त्यांना माहित नाही असा टोला लगावला आहे.
काही ठिकाणी मशीन बिघडल्याच्या तक्रारी
छत्रपती संभाजी नगरच्या पिसादेवी येथील बुथ क्रमांक १५ मधील खोली क्रमांक पाच मध्ये असलेले ईव्हीएम मशीन बंद असल्याने बराच वेळ मतदानाला सुरुवात झाली नाही त्यामुळे मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे अधिकारी कर्मचार्यांकडून ईव्हीएम मशीन बदलण्यासाठी तयारी सुरू होती.
.















